नमस्कार मंडळी, मागील लेखा मध्ये आपण यशस्वी व्यवसायासाठीची ४ सूत्र पाहिली. तुम्हाला शब्द दिल्या प्रमाणे या लेखामध्ये त्यातील पहिल्या सूत्राबद्दल आपण थोडे सविस्तर पाहूया.

व्यवसायाचे नेमके उद्देश

यशस्वी व्यवसाय करण्यासाठी किंवा यशस्वी उद्योग उभारण्यासाठी, तुम्ही करत असलेला व्यवसाय तुम्ही का करत आहात हे तुम्हाला १००% माहिती असणे खूप आवश्यक आहे. व्यवसाय / उद्योग करण्याच अंतिम ध्येय हे पैसा कमावणे जरी असले तरी फक्त पैसे कमवायचे आहेत म्हणून जर व्यवसाय करणार असाल तर अपयशाची खात्री १००%.

Before any one starts his business he must be aware of his clear purpose.  कारण जर उद्देश स्वच्छ, एकदम पारदर्शक असतील तर तुमचे व्यवसाय मध्ये यशस्वी होण्याचे संभावना खूपच चांगली आहे. जर खूपच काळजीपूर्वक पाहीले तर एक गोष्ट लक्षात येईल कि या पृथ्वीतलावरचा प्रत्येक माणूस हा पैशाच्या मागे नसतो. ठिक आहे सुरवातीच्या काळात (म्हणजे व्यवसाय यशस्वी होई पर्यंत) पैसा ही महत्वाची गरज आहे. पण एका ठराविक उंचीवर गेल्यानंतरपैश्यामुळे ज्या भावना तयार होतात, त्या भावना, इच्छा त्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडे पैसा हवा असतो. त्यातील काही विचार / भावना या खालीलप्रमाणे आहे.

  1. पैसा आल्यावर सक्षम असण्याची भावना.
  2. स्वतंत्र असण्याची भावना.
  3. सुरक्षित असण्याची भावना.
  4. आपल्या आवडत्या माणसांची व्यवस्थित काळजी घेऊ शकू याची भावना.
  5. दुसऱ्यांना त्यांच्या गरजेला मदत करता येईल याची भावना.
  6. तुमच्या आवडीनिवडी प्रमाणे जगता येणार त्याचा आनंद.
  7. सर्वात महत्वाचे म्हणजेतुमचे जीवन तुम्ही परिपूर्ण पणे जगू शकाल याची खात्री होते.

त्यामुळे तुमच्या व्यवसायाचे उद्देश ठरवत असताना प्रथम पैशाला महत्व देऊ नका. तुमच्या व्यवसायाचे उद्देश हा नेहमी नवीन ग्राहक तयार करणे आणि अतिशय योग्य प्रमाणात ग्राहक संतुष्ट ठेवणे हाच असावा. व्यवसाय कोणताही असो फक्त आर्थिक फायदा हा व्यवसायाचा अंतिम उद्देश असूच शकत नाही. चांगली ग्राहकसेवा दिल्यावर फायदा हा आपोआप होतच  असतो. या बद्दल आपणविक्री व्यवस्थापनया भागा मध्ये सविस्तर बघूया.

यशस्वी व्यवसाय करणे हे अतिशय सोप्पं आहे. यशस्वी व्यवसाय करण्याचे काही नियम आहेत. नियमांचे पालन काटेकोर पणे केले कि व्यवसाय यशस्वी होणारच. पण तसे घडत नाही. आपण नियम तोडतो त्या प्रवासाला एकदम अवघड करून टाकतो. व्यवसाय करण्यामागचा उद्देश काय असावा, हे आपण पाहीले आहेच. पण उद्योग यशस्वी होण्यासाठी  तुम्ही काय व्यवसाय करत आहात हे तपासणे आवश्यक आहे. व्यावसायिक अथवा Enterpreneur म्हणजे नेमके काय? जो व्यक्ती दोन लोकांमधील गरज पूर्ण करते तो व्यावसायिक होतो. पण उगाचच नुसताच व्यवसाय / धंदा करावा माझी आवड आहे म्हणून एखाद्या रहिवाशी संकुला मध्ये कपड्याच दुकान टाकणे योग्य नाही. व्यवसाय सुरवात करण्यापूर्वी खालील तीन गोष्टींची काळजी घेणे बंधनकारक आहे.

  1. सर्व प्रथम लोकांना गरजेची अशी वस्तू किंवा सेवा तयार करावी लागेल ज्यासाठी लोकं (ग्राहक) तुम्हाला पैसे देतील.
  2. तुम्ही तयार केलेली सेवा किंवा वास्तु याच विपणन (Marketing) विक्री भरपूर प्रमाणात केली पाहिजे.
  3. व्यवसायातून येणारा पैसा, मनुष्यबळ तसेच व्यवसाय यशस्वी होण्यासाठीच्या प्रत्येक कार्य हे व्यवस्थित सांभाळता आलं पाहिजे.

जर तुमचा व्यवसाय करण्याचा उद्देश स्वच्छ पारदर्शक असेल, म्हणजे तुम्हाला हा व्यवसाय का करायचा आहे हे एकदा कळल तर तो कसा करायचा हे आपोआपच लक्षात येईल.

मित्रांनो आज इथेच थांबूयात. पुढल्या लेखात भेटण्या पूर्वी एक छोटासा अभ्यास करूया. प्रत्येक व्यावसायिकाने स्वतःचा व्यवसाय तपासून पाहावा. तुमचे नेमके उद्दिष्ट काय आहे, तुम्हाला पैसे कशातून मिळतात. म्हणजे तुम्ही असे काय करता आहात ज्या मुळे तुम्हाला पैसा मिळतोय. तुम्ही जी गोष्ट करत आहात त्या गोष्टीची बाजारात खरोखरच गरज आहे का? जर तुम्ही विकत असलेली वस्तू बाजारातील गरज आहे, पण त्या प्रकारची वस्तू विकणारे बाजारात खूप जण आहेत तर; तुमचे वेगळेपण सिद्ध करण्यासाठी तुम्ही काय करत आहात हे तपासून पहा. जर वरील सर्व गोष्टी तुम्ही एकदम व्यवस्थित कराल तर तुमचा व्यवसाय सक्षम होईल. पण व्यवसाय म्हटले कि चढ उतार हे आलेच. जीवनात किंवा व्यवसायात जर सर्व काही एकदम सुरळीत चालले असेल तर समजायचे कि नक्की काही तरी चुकत असणार. आता या चढ उतारामुळे व्यवसायातून तुमच्या जीवनात खूप सारे ताणतणाव येतात. या ताणतणावांना यशस्वी पाने सामोरे जाणे म्हणजे स्वतःला कोणत्याही परिस्तिथीला सामोरे जाण्यास करणे होय.

तेव्हा मित्रांनो, पुढील लेखा मध्ये स्वतःमधील हिऱ्याला कसे तयार करायचे हे पाहूया. तो पर्यंत नमस्कार.