सेल्स सायकल (Sales Cycle)

मित्रांनो मागील भागात आपण विक्री व्यवस्थापनाबद्दल थोडक्यात पहिले. विक्री शिवाय कोणताही व्यवसाय जगू शकत नाही. ९० % विक्रीतील यश हे तुम्ही तुमचे उत्पादन, तुमची सेवा सांगण्यापूर्वी झालेली असते. कारण तुमचे उत्पादन, तुमची सेवा याच्या पेक्षा त्याच्या अवती भोवती असणारा वातावरण त्यातून मिळणारा संदर्भ हे खूपच महत्त्वाचे आहे. उत्पादना भोवतीचे वातावरणातील संदर्भ म्हणजेतुमच्या उद्योगाचे उद्देश, तुमची प्रतिमा, तुमची कार्य पद्धती, तुमचे ग्राहक सेवेचे बद्दल कार्य, तुमच्या सध्याच्या ग्राहकांची तुमच्या उत्पादन बद्दल असलेल्या भावना अश्या अनेक गोष्टी आहेत. ज्या मुळे तुमच्या उत्पादन / सेवा याच्या भोवती एक वातावरण तयार होत असते. एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुमच्या उत्पादन / सेवा याच्यापेक्षा  वातावरण व त्यातून मिळणारे संधर्भ, हे नेहमीच श्रेष्ठ असतात. तुमची सेवा / तुमचे उत्पादन कितीही चांगले असले तरी, जर त्याच्या वातावरणा मध्ये जर भेग असेल तर तुमचे विक्री चे कार्य सिद्धीस जात नाही. वातावरणामधील भेग म्हणजे – तुम्ही जे तुमच्याबाबतीतले संधर्भ तयार करत असता, त्या मुळे निर्माण होणारे सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा. वातावरण किंवा संदर्भ बिघडले कि उर्जा कमी होते. ज्या क्षणी उर्जा कमी होते त्यावेळी हे समझुन जायचे विक्री व्यवस्थापना मध्ये त्रुटी आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या विक्री वर होतो. म्हणजेच तुमची आर्थिक आवक थांबते व्यवसायात घसरगुंडी सुरु होते. म्हणूनच फार पूर्वी पासून एक म्हण आहेविकणाऱ्याची माती ही विकली जाते आणि काहींना सोने विकायला सुद्धा कठीण जाते”.

तुमचा व्यवसाय करण्यामागचा उद्देश कितीही चांगला असला, तुमचे उत्पादन सर्वश्रेष्ठ असले तरी उद्योग / व्यवसाय यशस्वी होण्यासाठी तुमचे उधिष्ट (Goal) हे पैसा कमवणे असले पाहिजे. इथं उद्देश आणि उद्दिष्ट या मधील फरक जाणून घ्या. तुमचा व्यवसाय करण्याचा उद्देश तुम्हाला चांगल काम करण्याची उर्जा देतो. चांगल काम केल्यावर पैसा हा आलाच पाहिजे. पैसा जर तुमच्या खात्यात यायला हवा तर तुम्हाला तुमच्या मालाची विक्री केली पाहिजे. विक्री म्हणजे Sales करण्यासाठी तुमची विक्री करण्याची पद्धती त्यामध्ये होणाऱ्या घटना ह्या समजून घेतल्या पाहिजेत. त्याला Sales cycle असे ही म्हणतात. Sales cycle हि नेहमीच परत परत होणारी घटना आहे. त्याचा अभ्यास करून तुम्हाला काही महत्व पूर्ण निर्णय घेऊन त्यावर कार्यवाही करणे महत्वाचे असते. असे असले तरीही माझ्या मते खालील बाबींवर प्रत्येक उद्योजकाने १००% लक्ष दिले पाहिजे.

  1. विक्रीची आकडेवारी ही तुमच्या व्यवसायाचा चेहरा असतो. कारण विक्री = कमाई
  2. या जगात प्रत्येकजण काही ना काही विकत असतो.
  3. यशस्वी व्यवसायासाठी, म्हणजे विक्रीचे आकडेवारी चांगली करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या ग्राहकाच्या मनामध्ये तुमच्या व्यवसाया बद्दल तसेच उत्पादनाबद्दल चांगली प्रतिमा तयार करता आली पाहिजे.
  4. यशस्वी व्यवसायासाठी देवाणघेवाण एकदम व्यवस्थित झाली पाहिजे. तेव्हा, तुमचे ग्राहक म्हणून असे लोक शोधा ज्यांना तुमच्या उत्पादनाची गरज आहे त्यांच्या कडे तुम्हाला देण्यासाठी पैसा आहे.
  5. यशस्वी व्यवसायासाठी, तुम्ही तुमच्या संभाव्य ग्राहकांना तुमचे उत्पादने विकण्यापूर्वी  त्यांच्या साठी काय करता ते खूप महत्त्वाचे आहे. कधीही संभाव्य ग्राहकांना थेट विक्री करण्याचा प्रयत्न करू नका. त्यापूर्वी त्यांच्याशी संपर्क निर्माण करा.
  6. प्रत्येकाकडे खूप ग्राहक वर्ग असतो. फक्त तो नीट सांभाळता आला पाहिजे. खूपजण हातच सोडून पळत्याच्या मागे जात असतात.
  7. यशस्वी व्यवसायाचे एक यशस्वी समीकरण

स्वतः विक्री करायला शिका. तुमचा व्यवसायाचा एक संघ (Team) तयार करून त्यांना पण विक्री करायला शिकवा.  

एकदा तुमच्या व्यवसायाच्या संघामध्ये प्रत्येकजण विक्री करायला शिकला, कि पैशाचा प्रवाह वाढायला वेळ लागणार नाही.  चला तर मग, विक्री व्यवस्थापनाकडे बारकाईने लक्ष्य देऊया आणि यशस्वी उद्योगाच्या दिशेने प्रवास सुरु करूया.