एकीचे बळ मिळते फळ. ही म्हण आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. एकी असण्याचे फायदे अनेक आहेत. पण भारता सारख्या कृषी प्रधान देशा मध्ये जसं जसं परिवार वाढत गेला तसं तसं शेत जमीन मधील बांध वाढत गेले. या वाढलेल्या बांधांमुळे प्रत्येक शेतकऱ्याला शेती करण्यासाठी त्याच्या वाट्याला आलेल्या जमिनीचा तुकडा लहान होत गेला. आज भारतामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या वाट्याला खूपच कमी जमीन आहे. प्रत्येक शेतकरी त्याच्या मालकीच्या जमिनीपुरत काम करू लागला व शेती ही फायदेशीर नाही ही भावना दृढ व्हायला लागली. एकतर भारतीय शेतकरी ही पावसावर अवलंबून आहे. जरी पाऊस चांगला झाला तरी सुद्धा पिकाची काढणी, काढणी पद्धती, तंत्रज्ञानाची कमतरता व त्याची बाजारपेठ याच्या मध्ये खूप मोठी दरी आहे. ही दरी दिवसें दिवस मोठीच होत आहे. सध्याच्या स्वतंत्र शेती करण्याच्या पद्धतीमुळे, म्हणजेच माझं मी करणार या मानसिकते मुळे प्रत्येक शेतकऱ्याचं जीवनमान खूपच खडतर होत आहे. त्यात खालील गोष्टी अधिक भर पडतात,
- बाजार पेठेचा अभ्यास नसणे
- एकट काम केल्याने प्रत्येक शेतकऱ्याची चांगला बाजार भाव मिळण्यासाठी जी शक्ती (Bargaining Power ) ही खूपच कमी झालेली आहे.
- प्रत्येकाने वेगळी ताकद लावल्यामुळे ताकद विभागली गेली आहे. याचमुळे शेतकऱ्याकडे थांबाण्याची (Holding Power) शिल्लकचं राहिली नाही.
- प्रत्येकजन स्वतंत्र काम करत आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला लागणारा खर्च वाढला आहे तसेच पिकवलेल्या शेतमालासाठी लागणारी बाजारपेठ काबीज करण्यासाठीचा खर्च ही वाढला आहे.
या बरोबर, अश्या अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे शेतकरी वर्गाची आर्थिक स्थिती ही दिवसागणीक बिकट होत चालली आहे. ही परिस्थिती अशीच मान्य करून कायमस्वरूपी कष्टात जगायचं कि काही चांगल्या सुधारणा करायच्या हा विचार करण्याची अत्यंत गरज आहे. आपण नेहमीच सरकारने काहीतरी करावं याकडे डोळे लावून असतो. पण सरकारने हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी प्रयत्न केला नाही असेही म्हणता येणार नाही.
सहकार माध्यमातून सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केलाच आहे. पण सहकार तत्व काही ठिकाणी सोडल्यास म्हणावं तसं यशस्वी झाले नाही. पण दुसऱ्याबाजूला ज्या खाजगी कंपन्या आहेत त्या मात्र चांगल्या स्थितीत आहेत. बाजारपेठ तीच. मग हा फरक कसा. अभ्यासा अंती सरकारने सहकार तत्वातील व खाजगी कंपन्यांची नियमावली या दोन्ही प्रकारांमधून चांगले गुण घेऊन शेतकरी वर्गासाठी कंपनी Act अंतर्गत नवीन नियमावली केली. त्याला Farmer Producer Company म्हणतात.
एक खूप प्रसिद्ध म्हण आहे, “ जर तुम्हाला लवकर पोहोचायचे असेल तर एकट जा, पण जर लांबवर जायचे असेल तर एकत्र जा” हाच काहीसा प्रकार Producer Company चा आहे. Farmer Producer Company ची काही प्रमुख वैशिष्टे म्हणजे
- ह्या प्रकारची कंपनी ही फक्त शेतकरीच करू शकतो.
- कंपनी अॅक्ट च्या अंतर्गत ही नोंदलेली असली पाहिजे.
- ह्या प्रकारच्या कंपनी मध्ये, शेतकऱ्यांनी, शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणे बंधनकारक आहे.
ही काही महत्वाची वैशिष्टे, भारताच्या २०१६-१७ च्या अंदाजपत्रका मध्ये शेतीसाठी घस घाशीत प्रयोजन केले होते. आज सारे विचारवंत हे जाणून आहेत कि हरितक्रांती नंतर आपण आपल्याला लागणारे अन्न धन्य स्वतः च उगवत आहोत. अन्न सुरक्षा ही पूर्ण आहे. तेव्हा आज शेतकऱ्यांच्या घरी पैसा आला पाहिजे. शेतकऱ्यासाठी अर्थक्रांती झाली पाहिजे. यासाठी Farmer Producer Company ला खूपच बढती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या अनुषंगाने आज खूपच Producer Company ची निर्मिती झाली आहे.
Producer Company ची संकल्पना म्हणजे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन खाजगी कंपनी कशी नफा डोळ्यासमोर ठेऊन काम करते, त्या पद्धतीने काम करणे महत्वाचे आहे. पण Producer Company बनवण्यासाठी शासनाकडून अर्थसहाय्य मिळते यासाठी जर Producer Company स्थापन करण्याचा विचार असेल तर तो उद्देश साध्या होणार नाही.
आज असे निदर्शनात आले आहे कि Farmer Producer Company ची स्थापना होते पण बहुतांश कंपन्या आर्थिक दृष्या सक्षत होत नाहीत. कारणे अनेक असू शकतील. पण माझ्या मते खालील काही कारणे महत्वाची ठरू शकतात.
- बहुतांश Farmer Producer Company आजही सहकार तत्वावर चालण्याचा प्रयास करतात.
- आज Farmer Producer Company कडे शेतीसाठी लागणारी सर्व गोष्टी ( Agriculture Input) विक्री व्यवस्थापन, पिक नियोजन व इतर अनेक गोष्टी करण्यासाठी सक्षम मनुष्य बळ नाही.
बाजारात जरी मनुष्यबळ उपलब्ध असले तरी ह्यांच्या उपयोग करून घेणे हे आपल्या पठडीत नाही. कारण आजही सर्व कामं स्वतः च करायची याच मानसिकते मध्ये अडकून आहोत
- आज बहुतेक Farmer Company चे संचालक मंडळ हे त्यांची कक्षा वाढवण्यास तयारच नाहीत. Comfort Zone मधेच अडकून आहेत. जो पर्यंत Comfort Zone मधून बाहेर पडत नाही तो पर्यंत Income Zone वाढणार नाही एवढ ज्ञानात राहू दया.
- आपल्याला आपली Farmer Producer Company एक व्यावसायिक रित्या चालवली पाहिजे. जर विचार करा कि शेतकऱ्याकडून तांदूळ अथवा कोणतेही अन्न, फळे, फुले घेऊन जे एखादी कंपनी १०० कोटीची होऊ शकते, तर तुम्ही आम्ही तयार केलेला माल व्यावसायिक रित्या बाजारपेठ मध्ये आणला तर आर्थिक क्रांती नक्कीच होईल.
आपल्या कडून जी खाजगी कंपनी माल विकत घेते त्याच्या पेक्षा आपल्या Farmer Producer Company कडे किती तरी जास्त प्रकारचे फायदे आहेत. गरज आहे फक्त व्यवसायिकतेची.
- व्यवसायात हिशोब, तसेच नफा तोटा पडताळणी याकडे दुर्लक्ष होऊन कदापी चालणार नाही. काटेकोर पणे नियोजन करणे खूपच गरजेचे आहे.
अश्या अनेक प्रकारच्या गोष्ट इथे नमूद होऊ शकतात. पण आज महाराष्ट्र तसेच भारतातील ज्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन Farmer Producer Company स्थापन करण्याचे कष्ट घेतले आहेत त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. आज तुम्ही एक खाजगी कंपनीच्या रांगेत उभे आहात. पण तुमची ताकद खूप मोठी आहे. खाजगी कंपनी मध्ये २-४ किंवा कधी कधी थोडे जास्त समभाग धारक ( Share Holder ) असतात. आज जरा बघा कि तुम्ही कितीजण आहोत. नक्कीच सर्व बाबतीत तुमची ताकद जास्त आहे. गरज आहे ती फक्त नियोजन व उच्च व्यवस्थापनाची.
माझं असं वैयक्तिक मत आहे कि जर Farmer Producer Company एका व्यावसायिक, उच्च व्यवस्थापनात संभाळली, तर तो दिवस लांब नाही ज्या दिवशी तुम्ही पिकवलेला माल हा तुमच्या दारात व तुम्हाला अपेक्षित दरात विकला जाईल.
समझुन घ्या, “एकीचे बळ मिळते फळ” या म्हणीचा.
Leave A Comment