मित्रांनो, तुमच्या मनाची शक्ती वापरून तुम्ही काहीही करू शकता हे तर आपण पाहिले आहेच. पण इथं असा प्रश्न उभा राहतो कि या सुप्त मनातील ताकतीचा वापर कसा करायचा. जी ताकद आपल्याला दिसत नाही त्या ताकदीपर्यंत पोहोचायच कसं. आहो एकदम सोप्प आहे. तुमचाच एक जवळचा, जिवाभावी मित्र आहे जो तुम्हाला या ताकदीचा वापर कसा करायचा हे शिकवेल. हा जो तुमचा जिवाभावाचा दोस्त जो तुमच्याबरोबर सतत असतो, तोच दोस्त तुम्हाला वाट दाखवत असतो. ह्याच जिवाभावाच्या दोस्तामुळे तुमच्या जीवनात खालील सर्व घटना घडत असतात. जसे कि,

  1. हा तुमचा मित्र तुम्हाला यशापर्यंत अथवा अपयशापर्यंत घेऊन जातो.
  2. हाच दोस्त तुमच्या मनावरील बोजा आहे.
  3. हा मित्र नेहमीच तुमच्याच मर्जी प्रमाणे वागत असतो.
  4. याची मैत्री तुम्ही सहजपणे सांभाळू शकता. महत्त्वाचं म्हणजे – तुम्हाला नेमके काय पाहिजे हे तुम्ही तुमच्या दोस्ताला सांगितलं तर जीवाच रान करून ती गोष्ट तुमच्यासाठी १००% करून दाखवतो.
  5. प्रत्येक मनुष्यप्राणी या त्याच्या दोस्ताचा गुलाम आहे.
  6. या दोस्ताची तुम्ही चांगली काळजी घेतली तर या जगातील सर्व प्रकारचे यश तुमच्या लोळण घालेल याची तो ग्वाही देतो.

असा हा, तुमच्यासाठी हितकारक दोस्त नेहमीच तुमच्यासाठीच, तुमच्या बरोबर असतो. म्हणूनच कि काय या जिवाभावाच्या मित्राचा अनादर केला कि तो तुम्हाला बरबाद करून टाकायला मागेपुढे बघत नाही. असा कोण तुमचा दोस्त आहे जो दोन्ही बाजूनी बरोबर असतो. ह्या तुमच्या जिवाभावाच्या दोस्ताच नाव आहे. “सवय”.

तुम्हाला तुमच्या सवयींतून नकारात्मक किंवा सकारात्मक उर्जा मिळत असते आणि हीच उर्जा तुम्हाला घडवते किंवा बिघडवते. याचं कारण, आपण पहिले सवय लावून घेतो व नंतर त्या सवयीचे गुलाम होतो. मनात रुजलेली सवय चांगली असो किंवा वाईट एखद्या मोठ्या पाणबुडी प्रमाणे सवय हि नेहमीच शांत व खोलवर रुजलेली असते. कोणतीही सवय मोडणं एवढं सोप्प नसतं, कारण कोणतीही सवय (वाईट किंवा चांगली) कडीला – कडी जोडत जाऊन कधी एक मोठ्ठी, न तुटणारी चेन तयार होते हे कळतच नाही. मग सवय मोडणं अत्यंत कठीण होत. तेव्हा ह्या “सवय” नावाच्या दोस्ताची जवळीक करताना जरा जपूण. कारण इथं, “हि दोस्ती तुटायची नाय” हे गाणं अतिशय समर्पक ठरते. एकदाका हि दोस्ती झाली तर – हा सवय नावाचा दोस्त तुम्हाला कधीच सोडत नाही. म्हणूनच पूर्वजांनी केलेल्या म्हणी समर्पक ठरतात. जसे कि, “जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही”. याचं कारण माणसाची सवय कधीच जात नाही. नवीन बदल हा फक्त – जुन्या सवयींवर रचली जाते. पण वातावरण किंवा परिस्थिती, हि मनुष्यापेक्षा खूप श्रेष्ठ असते. म्हणूनच जुन्या वातावरणात गेले कि तुमचा जुना दोस्त वाटच बघत असतो व तुम्ही जुन्या सवयीत नकळत घुसून जाता.

या सवय नावाशी दोस्ती कशी होते ते थोडक्यात पाहूया. कोणतीही गोष्ट – तुम्ही पहिले पाहता, नंतर त्या प्रमाणे कृती करता. जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही नेहमी, सतत्याने करता त्यावेळी तुम्हाला त्याची सवय लागते. उदा: दरमहा किंवा मिळालेल्या प्रत्येक कमाईचे १०% रक्कम बाजूला काठून ती गुंतवणूक करणे – हा तुमचा सवय नावाचा चांगला दोस्त. तुम्हाला हा चांगला दोस्तीची ओळख तुमच्या आजोबांनी करून दिली. म्हणूनच तुमच्या पहिल्या कमाई पासून तुम्ही १०% बाजूला काठून गुंतवले. हा दोस्त (नावं सवय) इतका जवळचा हे कि कितीही अडचण असली तरीही ह्या दोस्तीसाठी तुम्ही १० % बाजूला काढताच.

पण समजा, तुमच्या आजोबांनी तुम्हाला हे सांगितले असेल कि, पैश्यामुळेच सर्व समस्या निर्माण होतात त्यामुळे पैसा खर्च केलेला बरा, तर तुम्ही अश्या दोस्ताला जवळ करता जो तुम्हाला पैसा खर्च करायला भाग पाडेल.

तुम्ही, आम्ही या पृथ्वीवरील सर्व लोक हे सवयीनसतचे गुलाम. हा सवय नावाचा दोस्त तुम्हाला जे सांगेल, त्याच प्रमाणे सर्व जण कार्य करत असतात. म्हणूनच चांगल्या सवयीशी दोस्ती करायची असेल तर खालील चार गोष्टी समझुन घेणे महत्वाचे आहे.

  1. तुम्हाला कोणी बदलू शकत नाही – तसेच तुम्ही कोणालाही बदलू शकत नाही.
  2. कोणतीही सवय पूर्णपणे नष्ट होत नाही.
  3. चांगल्या सवयी दोस्ती टिकवायची असेल तर त्यात नियमीतता आणावी लागेल.
  4. एकदा वाईट सवयीशी दोस्ती तुटली कि त्या वातावरणापासून लांब रहा.

या पूर्वीही आपण पाहिले आहे. निसर्गामधून शिकण्यासारखं खूप आहे. कोणतीही मोठ्ठी नदी जवळून पहा. हि नदी मोठ्ठी होण्यासाठी त्या नदीला चांगल्या मित्राची मदत असते. त्याचं नाव आहे पाणी. पाऊस पडल्यावर प्रथम लहान झरे, नंतर छोटे मोठे ओढे नाले अस एकत्रीकरण सर्व बाजुनी होत असतं. असंख्य ठिकाणचे ओढे एकत्र येऊन एक छोटी नदी होते. २-३ नद्या एकत्र होऊन एक मोठ्ठी नदी होते.

आता इथं समझुन घ्या. तुमचा चांगला दोस्त म्हणजे –

  1. १०% प्रत्येक कामाईमधून बाहेर काढून गुंतवणे.
  2. अश्या अनेक १०% मधून होणारी मोठ्ठी रक्कम म्हणजे नदी.
  3. या रकमेची गुंतवणूक केल्यामुळे नियमित कामाई म्हणजे वाहता पैसा.

तेव्हा ह्या चांगल्या दोस्ताकडून – १० % बाजूला काढण्याची सवय लावून घेतली तर आयुष्यात किती बदल घडतील हे तर तुम्ही पहिलेच. विचार करा; जर आयुष्यातल्या प्रत्येक सवयीचे बरकाईने निरीक्षण करून त्यात सकारात्मक विचार घडवला तर श्रीमंतीच्या दिशेने तुमची वाटचाल हि १००% निश्चित. चला तर मग, चांगल्या सवयीचे गुलाम होऊया.