गणपती बाप्पा मोरया – बाप्पा या वर्षी चांगला पाऊस झाला. खरीपाच पिक चांगल येणार याची आशा आहे कारण रानं एकदम जोरदार, दमदार दिसतंय. तेव्हा या वर्षी माझ्या मालाला चांगला भाव मिळवून दे, अशी मनोभावे प्रार्थना  माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राने केली असेलचं. गणपती बाप्पा पण नक्की प्रसन्न होऊन आपल्याला मदत करणारच आहे, पण सर्वांना नाही. याचा अर्थ असा काढू नये कि, “बाप्पा दुजाभाव करेल.” करण तो कधीच आपल्या सारखा नसतो.

           तुम्ही जर असा नुसता विचाराचं करत राहिलात, तर तुमची ही कृती एकदम चुकीची आहे असे मी आत्ता ठामपणे सांगू इच्छितो. बघा ना; इतकी वर्ष मी चांगली शेती तर करतोच आहे, पण नुसती चांगली शेती करून उपयोग आहे का? शेवटी तुम्ही पिकवलेल्या शेतातल्या मालाला जर योग्य भाव मिळाला नाही तर खिशात पैसे कोठून येणार. तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा कि बाप्पाला नुसती  प्रार्थना करून उपयोग नाही तर त्याबरोबर इतर अनेक गोष्टी सामझुन घेऊन कराव्या लागतील. तुम्हाला एका व्यावसायिक (Businessman) माणसा सारखे वागावे लागेल. त्याच्या सारखा विचार करावा लगेल. जर या विचार पद्धतीने पुढे गेलो तर तुम्ही नक्कीच लकी व्हाल. नाहीतर माझं लकच (नशीब) खराब आहे असे सवयी प्रमाणे म्हणत बसु.

        आर्थिक यश व लक याचा काहीही संबंध नाही. जर भरपूर पैसा कसा कमवायचा हे शिकायचे असेल तर, तो तुमच्यासाठी असलेला पैसा कोठे व कसा तयार होतो हे समझने उचीत ठरेल.

         आपल्या शेतीची चांगली निगा राखून तुम्ही दर्जेदार उत्पादन तर इतकी वर्ष घेत आला आहातच; पण हे उत्पादन विक्री करण्यास किती तुम्ही वेळ देता. विक्री ही व्यवस्थापनातील अतिशय महत्वाची बाब आहे. वेळ, पैसा, मेहनत खर्च करून जे उत्पादन तयार करतो; ते तुम्ही दुसऱ्याच्या हातात देता. “याचा अर्थ असा कि; ज्या घटकेला तुमचं उत्पादन हे पैशाच्या स्वरुपात रुपांतर होते त्या घटकेला तुमचं एकदम दुर्लक्ष असतं.” म्हणजे काय कि तुमचा स्वतः चा पैसा तयार होत असताना तुम्ही चहा प्यायला गेलेला असता आणि मग संधी हुकते. या ठिकाणी एकच वाक्य डोक्यात असत “लकच साथ देत नाही राव..”

          हे वाक्यचं रुपांतर, “होय मी लकी आहे” या वाक्यात रुपांतर करायचे असेल तर तुमच्या मेहनतीने तयार झालेल्या शेतमालाची विक्री थेट ग्राहकाला करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, पण ही थेट विक्री व्यवस्था एक समान्य शेतकऱ्याला करणे जमणार नाही. यासाठी एकात्मिक शेती हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. पण त्यासाठी समविचारी शेतकर्यांनी एकत्र येणे महत्वाचे आहे. पण एक स्वंतत्र शेतकऱ्यांनी जर त्याच्या मालाचे वर्गीकरण केले तर नफा १०% ने वाढतो हा खूप जणांचा अनुभव आहे. मिळवलेला नफा हा व्यवस्थित वापरला तर पैशाला पैसा जोडला जाऊ शकतो. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की हा वाढीव नफा कमावण्यात तुम्हाला स्वासस्य नसतो, आणि दुसऱ्या बाजूला १०% ने कर्ज घेण्यास तुम्ही तयार असता. याचे एकमेव कारण म्हणजे जवळ जवळ ८०% च्या वर शेतकरी मित्र हे फक्त करण्यासाठी शेती करतात. बहुतांश शेतकऱ्यांना तुम्ही काय करता म्हणून विचारले तर फक्त एक उत्तर सारखे असते; “काही नाही हो, शेती करतोय” अभिमानाने कोणीच सांगत नाही कि, “माझा शेतीचा व्यवसाय आहे.”

          ज्या दिवशी शेतकरी हा शेती व्यवसाय करेल, त्या दिवसा पासून चित्र वेगळे दिसेल. तुम्ही लहान अथवा मोठे शेतकरी असाल- “व्यासायिक शेतकरी” होण्यासाठी काही गुण असतात. हे गुण प्रत्येक व्यावसायासाठी लागतातच. बघा ना, जगातल्या एका मोठ्या उद्योग समुहाने जर दर्जेदार उत्पादन केले पण विक्री व्यवस्थे मध्ये कमी पडले, तर तयार उत्पादनाचे पैश्या मध्ये रुपांतर होईल का ? निश्चितच नाही. जेव्हा तयार केलेले उप्तादने पैश्यात रुपांतर होत नाही, तेव्हा कर्जबाजरी आणि दिवाळखोरी हाच पर्याय राहतो.

           आता तुम्हाला एक गोष्ट नक्कीच कळली असेल कि तुम्ही एक शेतकरी, व्यावसायिक शेतकरी, एक उद्योग समूह यामध्ये काहीच फरक नाही, फरक आहे तो फक्त लहान मोठ्यांचा, सर्वांना विक्री व्यवस्थापन करावेच लागते. विक्री व्यवस्थापन चांगले करायचे असेल बाजार पेठेचा अभ्यास करणे खूप महत्वाचे आहे. बाजार पेठेचा अभ्यास म्हणजे Market Inteligence. पूर्वी बाजार पेठा व त्याचा अभ्यास करणे एक सामान्य शेतकऱ्याला खूपच जिकरीचे / अवघड होते. पण आज Internet च्या युगात सर्व सहज शक्य आहे.

           आधी  लिहिला प्रमाणे एक शेतकरी १०% जास्त नफा कमवण्यापेक्षा कर्जावर जास्त अवलंबून असतो, याचे एकमेव कारण त्याला हेच माहित आहे. त्यामुळे आता वेळ आली कि १०% जास्त नफा कमावण्याची, बाजार पेठेचा अभ्यास करून त्त्याप्रमाणे तुम्ही तयार केलेल्या मालाची विक्री करण्याची. तसेच बाजार पेठ व मालाची किंमत, कोणत्या सिझन मध्ये कशी आहे याप्रमाणे आपल्या शेतात काय पिकवायचे हे ठरवण्याची.

            बघा ना, शेतकरी मित्र नेहमी म्हणतो, तो काय बिझनेझ मॅन आहे. पण मित्रहो लक्षात ठेव एखादा कारखानदार वा बिझनेझ मॅन हा नेहमी एकाच प्रकरचे उत्पादन करता येऊ शकते. पण तुम्हाला, मला या बाजार पेठेची मागणी बघून उत्पादन करता येऊ शकते . या बाजार पेठेची प्रत्येक छोट्यातील छोटी बातमी तुमच्या कडे अगदी हाताचा मळ असल्यासारखी “कृषीकिंग” ह्या अँप वर मिळत असते. या अँपचे सदस्यत्व हे पूर्ण पणे मोफत आहे.

त्या मुळे मला आता तुम्हीच सांगा …

तुम्ही लकी (नशीबवान) आहात की नाही.