मूल्य आधारित नियमावली

आज पर्यंत मागील सहा  लेखं मधून खालील 3 मुद्दे पहिले आहेत

  1. तुमच्या व्यवसायाचं नेमके उद्देश काय आहे? (What is purpose of your business?)
  2. दबाब पेलण्याची क्षमता (Capacity to face the heat)
  3. विक्री व्यवस्थापन ( Sales Management)

वरील तिन्ही बाबी व्यवसाय यशस्वी करण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. पण व्यवसाय / उद्योगाच्या या तीन बाबींबरोबर इतर अनेक गोष्टी आहेत. त्त्या सर्वांना एकत्र बांधून ठेवले नाही तर प्रत्येक विभाग स्वतंत्रपणे त्याच्या मनासारखे करत राहील. यामुळे तुमचा व्यवसाय समुद्रात भरकटलेल्या नावेप्रमाणे होईल. तुम्ही जर काळजीपूर्वक बाजारातील घटनांकडे पाहिलेत कि असं लक्षात येईल कि काही व्यवसाय संस्था त्यांच्यावर कितीही संकट आल तरी डगमगत नाहीत. तुम्ही क्रिकेट मधील महेंद्रसिंग धोनी त्यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ बघा किंवा तुमच्या ओळखीच्या चांगले यशस्वी कुटुंबे त्यांच्या वागणुकीकडे बारकाईने पहा. यासर्व यशस्वी लोकांमध्ये / व्यवसायामध्ये / विजेता संघामध्ये एकच गोष्ट समान / सारखी असते. असं काही गुपित असत, याच्या आधारे कोणत्याही कठीण परिस्थितीत हे कुटुंब / ती संस्था / तो संघ एकदम घट्ट एकत्र बांधलेला असतो. ‘एकीचे बळ मिळते फळया म्हणीला धरून प्रत्येक कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन यशस्वी होत असतात. काय आहे हे गुपित? त्यांचे नियोजन, त्यांचे धोरण चांगले असते का ते एकदम लकी असतात. पण मित्रांनो असं काहीही नाही. खूप लोक चांगल नियोजन करतात, चांगला धोरण अवलंबतात. सुरवातीला यश मिळत असेल त्यांना. पण दीर्घकाळ यश टिकण्यात अपयशी ठरतात.

कोणत्याही परिस्थितीवर मात करून नेहमीच यशस्वी ठरणारी व्यक्ती / संस्था / संघ यांच्यामध्ये काही जिंकण्याचे गुण त्यांच्या रक्तात असतात. हे सर्व जिंकण्याचे / यशस्वी होण्याचे गुण मनावर इतके खोलवर रुजलेले असतात कि त्यांच्या आयुष्यात कोणत्याही कठीण प्रसंगी चुकीचे पाऊल पडत नाही. दबावाला यशस्वीपणे सामोरे जाऊन स्वतः ला घडवत असतात. जेव्हा एखाद्या अश्या प्रकारच्या कुटुंबामध्ये वाईट प्रसंग घडतात किंवा एखाद्या व्यवसायामध्ये खूपच पैशाची चणचण भासायला लागते, तेव्हा त्या कुटुंबाच्या किंवा तुमच्या व्यवसायामधील तुमचे भागीदार किंवा त्याला संलग्न अशी सर्व मंडळी यांच्या मनावरचा ताण स्पष्टपणे जाणवत असतो. अशावेळी जर ते गुपित माहिती नसेल तर लोकांच्या मनावरचा ताबा सुटतो. माणूस भावनिक होतो त्यामुळे त्याची विचारशक्ती कमी होते. अशाने माणसे / नाती तुटतात, भागीदारी संपुष्टात येते खूपच नुकसान होते. हे सर्व टाळता येते. यशस्वी व्यक्ती / संघ / संस्था ह्यांना एक गोष्ट चांगली माहिती असते, कि जर कोणत्याही (चांगल्या अथवा वाईट) परिस्थितीला सामोरे जायचे असेल तर ते गुपित तंतोतंत पणे पाळले पाहिजे. ते गुपित म्हणजे, “तुमच्या व्यवसायाची मूल्य त्यावर आधारित नियमावली”.

मला एक गोष्टीची चांगली जाणीव आहे कि तुमची हुशारी, तुमची धोरणे किंवा तुमचे नियोजन चांगले असेल तर तुम्ही ठराविक पातळीपर्यंत यशस्वी होता. पण, “तुमची मूल्य त्यावर आधारित नियमावलीजर खूप मजबूत असेल तर कितीही संकट आले तरीही तुम्हीच यशस्वी होता. याच मूल्य आधारित नियमावलीच्या आधारे खूप साऱ्या लोकांनी त्यांच्या आयुष्यात, आर्थिक / सामाजिक / व्यवसायिक यश मिळवले आहे. हीच मूल्य आधारित नियमावली तुम्हाला तुमच्या कुटुंबाला कठीण काळात एकत्र राहण्यात मदत करतात.

ही मूल्य आधारित नियमावली म्हणजे व्यवसायातील प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्याबरोबर कसे वागायचे ह्याचे साधे नियम. एक संघ म्हणून काम करत असताना आपल्या सहकाऱ्याबरोबर कसे वागायचे ह्यांचे नियम. ही नियमावली फक्त कागदावर असून उपयोग नाही. हे सर्व नियम खोल मनावर रुजलेले असले पाहिजेत. कारण नियम काय प्रत्येक ठिकाणी असतात. पण ठरवलेले नियम पाळले जातात का हे बघणं खूपच महत्वाचं ठरेल. बहुतांश ठिकाणी असं होत नाही. त्यामुळे, “मूल्य आधारित नियामवलीम्हणजे स्वतः वर / प्रत्येक सहकाऱ्यावर त्या संघाने / व्यवसायाने ठरवलेली नियमावली तंतोतंत पाळण्याची शिस्त. ही शिस्त कोणाला दाखवण्यासाठी नाही तर स्वतःसाठी असायला हवी. कारण एकदा का शिस्त समोर ठेऊन नियमावली पाळायला सुरवात झाली कि मग त्या शिस्तीची सवय होते. नेहमीच शिस्त / नियम पाळल्यामुळे ती मनात खोलवर रुजून जाते. आणि प्रत्येकवेळी तुमच्या कळतनकळत तुम्ही त्या शिस्तीच / नियमांचे पालन करत राहता. ह्या मूल्य आधारित नियमावलीच्या शिस्तीने पालन केल्यामुळे तुमच्या संघात / व्यवसायात एक प्रकारचा विश्वास निर्माण होतो, एक उच्च दर्जाची उर्जा निर्माण होते याचा संयोग बघाएक उत्कृष यश तुम्हाला मिळते.